श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
!! कंबरच मोडली !!
एस.के.24 तास दिनांक,04/10/2025
भर उन्हाळ्यात भू - स्वामिने
नांगरटी केली वखरणी
पडला पाऊस मृगाचा
शेतात केली धानरोवणी,पेरणी - १
पोटच्या पोरा वाणी वापता
बालपणापासून केली जोपासना
मावा तुळतुळा खोडकिळा करपा
लागू नये म्हणून केलीउपासना - २
भर तारुण्यात टवटवीत उभा
हिरवा गार शेतात डुलत होता
श्रावणाचा महिना लागताच
काळी गर्भा- पोटऱ्यात येता - ३
पूर्ण मुदत दिवसाची भरली
सोन्यासारखा शेत पिवळा झाला
टाकलेला लोंब पाहून धन्यआनंदी
वाढीव उत्पन्नाने बळीभारावला - ४
माझ्यापेक्षा तू मोठा राजा नाही
निसर्गाने ठणकावून सांगितले
शेतकऱ्याचा घात करण्यास
त्याने उलटे चक्र फिरवले - ५
वादळ, वारा, ढगफुटी
धो- धो पाऊस बरसला
शेतातला कापणीचे धान,पिकं
टोंगराभर पाण्यात निजवला - ६
होत्याचे नव्हते झाले क्षणात
आनंदावर दुःखाने मात केली
बांधातल्याउभ्या धान, मालकाची
निसर्गाने पार कंबरच मोडली - ७
निसर्गाने पार कंबरच मोडली.
निसर्गाने पार कंबरच मोडली...
------------------------------------
श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे
मु .पो.अ-हेरनवरगांव ब्रह्मपुरी
ता.ब्रह्मपुरी जिल्हा- चंद्रपुर..४४१२०६
मो.नं.८३०८००५८६८