सेवापर्व उपक्रम वन्यजीव सप्ताह चे संयुक्त विद्यमाने मा.उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग तसेच मा. वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) गडचिरोली तर्फे....
📍हरीत महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत व " वन्यजीव सप्ताह " निमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
एस.के.24 तास
गडचिरोली : दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे.१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव संरक्षण,संवर्धन आणि जनजागृतीसाठी साजरा केला जातो.या आठवड्यात वन्यजीवांचे महत्व,त्यांचे संवर्धन, तसेच वन्यजीव व मानव यांच्यातील संतुलन जपण्याचे आवाहन करण्यात येते.
भारत हा जगातील समृद्ध जैवविविधतेचा देश असून वाघ,बिबट्या,हत्ती,सिंह,गेंडा यांसह असंख्य प्राणी,पक्षी व सरपटणारे जीव येथे आढळतात. मात्र, वाढती शहरीकरणाची गती,जंगलतोड, प्रदूषण आणि शिकारीमुळे हे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
“ वन्यजीवांचे रक्षण करा - निसर्ग वाचवा ” हा संदेश देत या आठवड्यात जनजागृती केली जात आहे.
विशेष म्हणजे,यंदा या सप्ताहाचा मुख्य भर मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर आणि निसर्गाशी सुसंवाद वाढवण्यावर आहे. दिनांक,03/10/2025 शुक्रवार ला हरीत महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवापर्व उपक्रम वन्यजीव सप्ताह चे संयुक्त विद्यमाने...
मा.उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग तसेच मा.वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) गडचिरोली श्री.बि.डी.भेंडेकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र गुरवळा मधील येवली नियत क्षेत्रात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डी.एस.कोसनकर सरपंच डोंगरगाव, डि.पी.निसार उपसरपंच हिरापूर, पी.एम.पालकवार.उपसरपंच डोंगरगाव, पि.पि.मेश्राम पोलिस पाटील मारकबोडी, के.डी.राऊत.पोलिस पाटील शिवणी, चोखाजी.बांबोळे सामाजिक कार्यकर्ता येवली, ए.वाय.भांडेकर प्रतिष्ठीत नागरीक येवली, एम.ए.पालकवार प्रतिष्ठीत नागरीक मारकबोडी, जे.एन.सरोदे क्षेत्र सहाय्यक गुरवळा,पी.एम.मेश्राम वनरक्षक पश्चिम गुरवळा अतिरिक्त पूर्व गुरवळा,पि.एम.अल्लीवार वनरक्षक येवली उपस्थित होते.