मुल नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजपकडून शिक्षित,संस्कारित आणि लोकाभिमुख प्रा.डॉ.किरण किशोर कापगते (बोरकर) नगराध्यक्षपदासाठी रिंगणात.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : शिक्षित,संस्कारित आणि जनसेवेच्या आदर्शात घडलेली व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.किरण किशोर कापगते (बोरकर)मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर *विकास पुरुष आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासाठी प्रा.डॉ.किरण किशोर कापगते (बोरकर) यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
शिक्षण,संस्कार आणि सामाजिक बांधिलकी असलेली ही उमेदवार लहानपणापासूनच सामाजिक कार्यात अग्रणी होती.समाजाभिमुख कार्य करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाली असून,सुशिक्षित व संवेदनशील अशा वातावरणात वाढ झाल्याने जनसेवेची ज्योत बालपणातच प्रज्वलित झाली.
महिला सशक्तीकरणाला आयुष्यभर वाहिलेल्या प्रा.डॉ.किरण कापगते या ज्ञान संस्कार आणि नेतृत्वाची विलक्षण सांगड आहेत.समाजातील प्रत्येक महिलेला उभारी देण्यासाठी त्या सातत्याने प्रेरणादायी कार्य करत आल्या आहेत.शिक्षणाच्या बळावर महिलांना स्वावलंबी करण्याची त्यांची तळमळ आज अनेकांसाठी दीपस्तंभ ठरली आहे.
आपल्या कर्तृत्वाने आणि संवेदनशील नेतृत्वाने त्या महिला विकासाच्या दिशेने नवा मार्ग दाखवत आहेत.सबलीकरण हे केवळ शब्द नसून,त्या प्रत्यक्ष कृतीतून महिलांसाठी सामर्थ्य निर्माण करणाऱ्या खऱ्या प्रेरणास्त्रोत आहेत.प्रा.किरण कापगते यांचे पती किशोर कापगते हेही सुशिक्षित असून दोघेही मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी कार्यकर्ते म्हणून जोडले गेले आहे.
विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहीमा, शैक्षणिक कार्ये आणि लोकहिताच्या अनेक कृतींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. समाजासाठी केलेल्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊनच यंदाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे सांगितले जात आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा.डॉ.किरण कापगते यांनी जोशपूर्ण प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे.
भाजपचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि समर्थक यांना एकत्र आणत त्यांनी प्रभागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.विकास,स्वच्छ प्रशासन आणि लोकाभिमुख कारभार हेच या निवडणुकीचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.“ जनतेची सेवा हीच आमची प्राथमिकता असून,ही निवडणूक जिंकून मुल शहराच्या विकासात नवे पर्व सुरू करणे हेच माझे ध्येय आहे.”
अशा शब्दांत त्यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.मूल मध्ये यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून कापगते दांपत्याचा अनुभव,शिक्षण आणि सेवा भाव भाजपसाठी मोठी ताकद ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.


