ने.हि.महाविद्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी जयंती आणि सामाजिक एकात्मता दिवसाच्या निमित्ताने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,मेजर प्रा विनोद नरड यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.स्व.इंदिरा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण पणाला लावून देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून प्रयत्न केले,असे विचार प्राचार्य डॉ शेकोकरांनी व्यक्त केले.यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ धनराज खानोरकर
डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ युवराज मेश्राम, पर्यवेक्षक संगीता ठाकरे, डॉ हर्षा कानफाडे,प्रा भीमा डांगे,डॉ शेकोकर मॅडम, डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे, डॉ विवेक नागभीडकर,डॉ योगेश ठावरी,प्रा दलेश परशुरामकर, प्रा जयेश हजारे, प्रा धिरज आतला,डॉ ज्योती दुपारे,प्रा कोमल ठोंबरे,प्रा पराते,प्रा मेंघरे, रोशन डांगे, घनश्याम नागपूरे इत्यादी मान्यवरांनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
संचालन व आभार डॉ.युवराज मेश्रामांनी केले. यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा डॉ. खानोरकर,प्रा.आतला,जगदिश गुरनुले यांनी सहकार्य केले.

