एस.के.24 तास
वर्धा : पुलगाव lश्रीधाम मल्टी थेरेपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रा ली अंतर्गत श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे डॉ एस एन सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस केक कापून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी डॉ.किशोर बमणोटे आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ विपुल पाटील जिल्हाध्यक्ष डॉ.पंकज येसनकर श्री.अनिल कराळे श्री.गजानन कैलो के श्री.सावंत कुं.पाठभाजे नर्स बोरगाव धांदे व येथील गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
शेवटी डॉक्टर विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून व सुतार साहेब यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.


