सावली तालुक्यातील कढोली येथे मल्लेश मेरफुलवार रा.हरांबा 1 जेसीबी,श्रीमती,सिंदूबाई बोदलकर रा.उपरी,राजेश सातपुते रा.उपरी यांच्या मालकीचे 2 ट्रॅक्टर जप्त.
📍सावली वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही.
एस.के.24 तास
सावलीः सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड,नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा कढोली लगतचे वनविभागाचे जागेतून विनापरवानगी उत्खनन केल्याबाबत 3 ट्रॅक्टर व 1 जेसीबी दि. 21/11/2025 शुक्रवार रोजी जप्त करण्यात आली.
दि.21/11/2025 रोजी सायं.8.00 वा.चे दरम्यान श्री.अनंत राखुंडे क्षेत्र सहायक व्याहाड व श्री महादेव मुंडे वनरक्षक सिर्सी यांनी व्याहाड उपक्षेत्र अंतर्गत रात्र कालीन वनगस्त करीत असताना मौजा कढोली गावालगत वनविभागाचे मालकीचे गट क्रं.144 मध्ये व्यावसायिक दृष्ट्या अवैध उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आले.
वन गुन्हा क्रं.204/232852/2025 दि.21/11/2025 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 (1) ई व 35 (1) ग नुसार वन गुन्हा नोंदवून सदरचे वन वन गुन्ह्यातील सहभागी...
1) मल्लेश नरसय्या मेरफुलवार रा.हरांबा
यांचे मालकीचे जेसीबी, रंग-पिवळा, कमांक MH-33/4487 चेसिस कमांक HAR3DXSSL01893466 व महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर B275DI- रंग-लाल MH34/BV-5332 (माती भरलेला) चेसिस कमांक MBNADAEXLMN C01812 (ट्रॉली क. नाही, रंग-लाल) (माती भरलेला)
2) श्रीमती सिंदूबाई किसनदेव बोदलकर रा.उपरी
यांचे मालकीचे ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य 843XM, ट्रॅक्टर क. नाही, रंग-निळा चेसिस कमांक UZTB79628127986 (ट्रॉली क. नाही, रंग-लाल)
3) राजेश नामदेव सातपुते रा.उपरी
यांचे मालकीचे ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य 735FE, (ट्रॅक्टर क्रं.नाही) रंग-निळा व पांढरा (कमांक नाही)
चारही वाहने वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे वनविभागाचे ताब्यात जप्त करण्यात आली.
सदरचे मोहीमेकरीता सतिश नागोसे वनरक्षक,चितेगांव,रमेश बोनलवार वनरक्षक टेकाडी,सतिश मजोके,बंडू दुधे, रवि सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल व पीआरटी चमू सिर्सी यांनी मोलाचे सहकार्य केले.
पुढील तपास श्री.राजन तलमले विभागीय वन अधिकारी,चंद्रपूर व श्री.विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग,चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.

