सावली तालुक्यातील पाथरी पोलिसांनी बनावट विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या तीन आरोपीना अटक करून 6 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
एस.के.24 तास
सावली : पाथरी पोलिसांनी बनावट विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या तीन जणांना रंगेहाथ पकडत तब्बल 6 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली असून आरोपी क्रिष्णा धर्मा कंजर वय,19 वर्ष, रा.जटपुरा गेट परिसर, चंद्रपूर,प्रकाश रमेश भोयर वय, 37 वर्ष, रा.भानापेठ, चंद्रपूर,सागर राजेश कंजर वय,32 वर्ष रा.जटपुरा गेट परिसर, चंद्रपूर यांना अटक केले.
पाथरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पालेबारसा–पाथरी मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी एक पांढरी स्विफ्ट डिझायर क्रं.MH.40 AR व एक सुझुकी अॅक्सेस मोपेड क्रं MH.34 CP 2798 थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारू आढळून आली.
रॉयल स्टॉग कंपनीची एकूण 384 सिलबंद बॉटल्स किमत 84 हजार रुपये,स्विफ्ट डिझायर कार किंमत 5 लाख,सुझुकी अॅक्सेस मोपेड 60 हजार रुपये व तिघांकडील मोबाईल किंमत 22 हजार रुपये असे एकूण 6 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली असता सदर दारू बनावट असल्याची पुष्टी केली. या प्रकरणी पाथरी पोलीस स्टेशनला अप.क्रं ११३/२०२५ अन्वये कलम १२३ भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ६५(अ), ६५(ई), ८३ मदकां अंतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोउपनि गोविंद चाटे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पोउपनि गोविंद चाटे, सफौ. अशोक मोहुर्ले, पोहवा. खैलेश कोरे, सुनिल गेडेकर, येनुनाथ मडावी, पोअं. आंबोरकर,अमित म्हस्के, बळीराम बारेकर, प्रविण कोवे, विकेश वनरकर, लक्ष्मीकांत खंडाळे, किरण भगत, मेघशाम गायकवाड, राजकुमार सिडाम, संदीप शेळके यांनी केले.

