ब्रम्हपुरी येथील स्पा (मसाज)सेंटरवर पोलिसांची धाड ; 3 महिलांची सुटका.
📍स्पा सेंटरचा मॅनेजरला 2 दिवसाची पोलीस कोठडी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - दिनांक,23/11/2025 ब्रम्हपुरी शहरातील नागभीड रोड रस्त्यावरील गीत पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटर येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
दिनांक,२२ नोव्हेंबर २५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी विशेष पोलीस अधिकारी, महिला पंच, समाजसेविका आणि बनावट ग्राहक यांच्या उपस्थितीत धाड टाकून कारवाई केली.
या कारवाईत मिझोराम व नागालँड राज्यातील तीन महिलांची सुटका करण्यात आली त्याचबरोबर स्पा सेंटरचा मॅनेजर करण गंगाधर मोजनकर वय 24 वर्षे राहणार पांजरेपार तालुका नागभीड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्पा चालविणारा मालिक प्रितेश बुरले राहणार भवानी वार्ड ब्रह्मपुरी हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
धाडीत रोख रक्कम,मोबाईल रजिस्टर पावती बुक स्कॅनर निरोध पाकिटे असा एकूण 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम ३,४ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,प्रमोद बानबले पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी,सहाय्यक पोलीस निरीक्षिका शितल खोब्रागडे,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे, नितेश महात्मे,छाया निकोडे, निराशा तीतरे,अर्पणा मानकर, प्रफुल्ल गारघाटे,प्रदीप मडावी,अजित शेंडे, सुमित बरडे दिनेश आराडे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि समाजसेविका सरिता मालू, माया मेश्राम,हर्षा वानोडे यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांची ही संयुक्त कारवाई असून पुढील तपास सुरू आहे.स्पा सेंटरचा मॅनेजर याला ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

