संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे. 📍धमक्या देवून,मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही. - आमदार विजय विजय वडेट्टीवार

संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे.


📍धमक्या देवून,मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही. - आमदार विजय विजय वडेट्टीवार 


एस.के.24 तास


मुल : संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे.धमक्या देवून,मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही.त्यामुळे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि समन्वय ठेवुन प्रचार करावा.असे मत माजी मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.


२ डिसेंबर रोजी होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशन प्रसंगी स्थानिक कॉंग्रेस भवन येथे आमदार वडेट्टीवार बोलत होते.स्थानिक रामलीला भवन समोर पार पडलेल्या विरोधकांच्या सभेत झालेले भाषण म्हणजे पराभवाच्या भितीपोटी पदाचा दुरुपयोग असुन त्यावर आपण लवकरच उत्तर देवु.असा इशाराही त्यांनी दिला. 


कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी कॉंग्रेसपक्षात एकतेचा विचार रुजला असुन पक्षाचे सर्व कार्यकर्ते नाराज न होता एकदिलाने सौ.एकता समर्थ यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी पक्षाच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता समर्थ यांचेसह सर्व उमेदवारांनी आपला परिचय करून दिला. 


शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी संचालन आणि तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले यांनी आभार मानले.यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिमदयालवार,राकेश रत्नावार,प्रशांत समर्थ,राजेंद्र कन्नमवार,घनश्याम येनुरकर, प्रा.किसन वासाडे, रुपाली संतोषवार,बाबा अजीम.संदीप कारमवार,किशोर घडसे, पवन नीलमवार आदी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !