कवी अमरदीप लोखंडे यांचा संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्काराने गौरव.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१९/११/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील रहिवासी कवी, सामाजिक कर्तव्याची बांधिलकी जोपासणारे,सामाजिक, शैक्षणिक,वृक्ष लागवड या कार्यात तळमळणारे आणि जनतेचे आरोग्य सुदृढ,निरोगी राहावे यासाठी परिसर झाड लोट करून स्वच्छ ठेवणारे अमरदीप लोखंडे यांच्या कार्याची दखल घेत मदत सामाजिक संस्था,नागपूर
दिनांक,16 नोव्हेंबर 2025 रोजी श्री. गरुदेव सेवाश्रम, नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळ्यात संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कार, प्रमाणपत्र व भारताचे संविधान संस्थेचे सचिव दिनेशबाबू वाघमारे व पदाधिकारी यांनी देऊन त्यांचा गौरव केला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी यांनी त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव केला असून सतत असेच कार्य हातून घडत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.या अगोदर त्यांना विविध संस्थांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , जीवन गौरव यासारखे व शैक्षणिक क्षेत्रातील तालुका ते राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे पुरस्कार मिळालेले आहेत.


