मुनगंटीवारांच्या शब्दांना जनतेचा विश्वास. - प्रा.डॉ.किरण कापगते विजयाच्या उंबरठ्यावर.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : 📍मुनगंटीवारांचा विश्वास,कापगते विजयाच्या उंबरठ्यावर.
📍मुल च्या विकासाचा वेग कायम भाजप उमेदवार कापगते चर्चेत.
📍सुशिक्षित नेतृत्वाची निवड: कापगते यांच्या प्रचाराला वेग.
📍मुनगंटीवारांच्या विकासकामांचा फायदा, भाजपला वाढता जनसमर्थन.
📍विकासाचा मजबूत ट्रॅकरेकॉर्ड; नगराध्यक्षपदासाठी कापगते आघाडीवर.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार प्रा.डॉ.किरण किशोर कापगते यांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली असून त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक आणि सुसंस्कृत प्रतिमेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हे मजबूत गढ मानले जाते.
गेल्या अनेक वर्षांत त्यांनी मुल शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणारी विकासकामे केली आहेत. रस्ते, ड्रेनेज, सभागृह, क्रीडा संकुल, रुग्णालय इत्यादी अशा नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देत शहराचा सर्वांगीण विकास साधला.विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून नगरपरिषदेत प्रशासक राज असतानाही आमदार मुनगंटीवार यांनी मूल शहराकडे पूर्ण लक्ष दिले. निधीची कमतरता भासू दिली नाही. शहर स्वच्छतेच्या टेंडरचा कालावधी संपल्यानंतरही एक्स्टेंशन मिळवून देण्याचे काम त्यांनी तातडीने केले.
सध्या केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे,त्याचबरोबर आपल्या क्षेत्राचे आमदार मुनगंटीवार हे सुद्धा भाजपचे असल्यामुळे स्थानिक विकासासाठी फायदेशीर ठरले आहे. आगामी काळात नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली नाही तर निधी मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. आतापर्यंत ज्या वेगाने मूल शहरात विकास झाला आहे, त्यापेक्षा अधिक विकास भविष्यात अपेक्षित असल्याने मतदारांचा कल भाजपकडे झुकल्याचे दिसत आहे.
त्या पाठोपाठ,आता एक सुशिक्षित, गुणी व सुसंस्कृत उमेदवार म्हणून प्रा. डॉ.किरण कापगते यांना मैदानात उतरवून भाजपने विजयाचा मार्ग आणखी सुलभ केला असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
" मुनगंटीवार यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे," अशी भावना जनतेत असून त्यांच्या विश्वासार्हतेमुळे कापगते यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये ठाम विश्वास निर्माण होत आहे.


