" जो शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाही,त्याला आमचं मत नाही,घरी कुठल्याच पक्षाच्या उमेदवारांना प्रवेश नाही. " 📍सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप.

" जो शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाही,त्याला आमचं मत नाही,घरी कुठल्याच पक्षाच्या उमेदवारांना प्रवेश नाही. "


📍सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप.

एस.के.24 तास


नागपूर : पावसामुळे संपूर्ण शेती उदध्वस्त झाल्यानंतर केवळ तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका न घेता निवडणूक राजकारणात गुंग झालेल्या विरोधी पक्षातील नेत्यांबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप आहे.


दोन डिसेंबर ला होणाऱ्या पालिका - पंचायत निवडणुकीच्या गावोगावी दौरा करणाऱ्या नेत्यांच्या वाहनांचा ताफा पाहून संताप अधिक अनावर झाला आहे, त्याची एक झलक भिवापूरमध्ये एका शेतकर्‍याने राजकारण्यांना उद्देशून लावलेल्या फलकातून दिसून येते.निवडणुकीच्या रणधुमाळीत हा फलक त्यावरील मजकुराने चर्चेत आला आहे.


आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, असे सर्वच राजकीय पक्षाचे नेते म्हणत असले तरी त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना, समस्यांची जाण असतेच असे नाही, निवडणुका आल्याकी शेतकऱ्यांची आठवण करणारे नेते निवडणुका पार पडल्यावर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाही हा आजवरचा अनुभव.वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केले की झाले.असा समजच विद्यमान सत्ताधाऱ्यांनी करून घेतला आहे.


तरीही मायबाप सरकार काही तरी विचार करेल व शेतकऱ्यांच्या मदतीला धावेल, त्यांच्या संवेदना समजून घेईल,अशी भाबडी आशा शेतकरी लावून बसला होता.ती अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमीत हानीनंतर आणि त्यासाठी सरकारने दिलेल्या तुटपुंज्या मदतीनंतर फोल ठरली.ऐवढच काय तर कापूस, सोयाबीनची खरेदी निम्म्या दराने होऊनही सरकार खरेदी केंद्र सुरू करण्यास तयार नाही, मातीमोल दराने त्यांना शेतमाल विकावा लागतो याची प्रचंड चिड नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात आहे. 


जिल्ह्यात ८० हजार हेक्टवर पीक हानी झाली यातून शेतकऱ्यांच्या हानीची तीव्रता व्हावी.एकीकडे ग्रामीण भागात विदारक स्थिती असताना पालिका-पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सरकार कोट्यवधीची उधळपट्टी करीत आहे, राजकीय पक्ष प्रचारावर लाखो रुपये उधळत आहे, याचा संताप शेतकऱ्यांच्या मनात आहे.


भिवापूर तालुक्यातील तरुण शेतकरी सचिन काळे यांनी एका फलकातून त्यांच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काळे यांनी त्यांच्या घरीच भला मोठा फलक लावला आहे. त्यावर राजकीय नेत्याना उद्देशून जो मजकूर लिहिला आहे त्यातून सर्व शेतकऱ्यांच्या प्रातिनिधीक भावना कळतात.


“ जो शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत नाही,त्याला भिवापूर नगर पंचायत निवडणुकीत आमच मत नाही,आमच्या घरी कुठल्याच पक्षाच्या उमेदवारांना प्रवेश नाही ” असे या फलकावर लिहिन्यात आले आहे. सध्या समाज माध्यमांवर हा फलक चांगलाच व्हायरल झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !