" आयात उमेदवारावर विसंबून मूल जिंकणार कसे ?” 📍भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या प्रा.डॉ. किरण किशोर कापगते यांची प्रतिमा विपक्ष साठी मोठे आव्हान.

" आयात उमेदवारावर विसंबून मूल जिंकणार कसे ?”


📍भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या प्रा.डॉ. किरण किशोर कापगते यांची प्रतिमा विपक्ष साठी मोठे आव्हान.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर मूल शहरातील राजकीय चर्चा एका मुद्द्यावर एकवटली आहे.विपक्षकडे स्वतःचे नेतृत्व उरलेच नाही का ? मागील निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर भाजपचे दणदणीत वर्चस्व,तर विपक्षला मिळालेली केवळ 1 जागा,हे चित्र आजही मतदारांच्या स्मरणात ताजे आहे.या पराभवानंतर विपक्षकडे शहरात कोणताही दमदार चेहरा पुढे न आल्याने, शेवटी भाजपमधूनच आयात केलेल्या उमेदवार आणण्याची वेळ त्यांच्यावर आली.


“ विपक्षकडे माणसं नाहीत, नेतृत्व नाही, कल्पना नाहीत,म्हणून भाजपचे कार्यकर्ते आयात करून त्यांना उमेदवारांचा तुरा लावण्यावाचून पर्यायच उरला नाही. ”

“ पाच वर्षे दिसले नाही,आता टिकट मिळताच अचानक लोकसेवा आठवली ? ” राजकारणात सक्रियता, सातत्य, संघर्ष आणि जनसंपर्क ही लोकसेवेची मूलभूत तत्वे आहेत.ज्यापासून विपक्ष संपूर्णतः वंचित आहे.


भाजपने सत्तेत असताना रस्ते, पाणीपुरवठा,कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा,महिलांसाठी योजना इत्यादि या प्रत्येक कामात सक्रियता दाखविली, तर विपक्षची भूमिका ‘केवळ विरोधासाठी विरोध’ एवढीच होती.

“ काम शून्य,उपस्थिती शून्य,आणि टीका मात्र प्रचंड,हाच विपक्षचा मागील ५ वर्षांचा सारांश.” “ नेतृत्व आयात करून शहर चालत नाही,तर पार्टीचे संघटन मजबूत असणे आवश्यक”.विपक्ष ने मूळचे उमेदवारांना मागे टाकून भाजपमधील लोकांना उमेदवारी देणे म्हणजे त्यांच्या संघटनात्मक अपयशाची कबुली आहे.


स्थानिक राजकारणात ही चर्चा जोर धरू लागली आहे. - 


 “ विपक्षला स्वतःच्या घरातून एकही नेतृत्व काढता आलं नाही का ? ”


“ विकासावर लढण्याऐवजी आयात व्यक्तींवर अवलंबून राहणे म्हणजे पक्षाची दिशाहीनता नाही का ? ”


प्रा.डॉ. किरण कापगते  ‘ काम , गुणवत्ता आणि स्वच्छ प्रतिमा’ BJP चा सर्वात मोठा मुद्दा.


भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या प्रा.डॉ. किरण किशोर कापगते यांची प्रतिमा विपक्ष साठी मोठे आव्हान ठरत आहे.

त्यांची ओळख - स्वच्छ आणि पारदर्शक कार्यपद्धती,शैक्षणिक आणि सामाजिक अनुभव,शहरातील सक्रिय उपस्थिती,महिलांच्या समस्यांवर ठोस भूमिका,अशी आहे.भाजपकडे,शहर कसे बदलणार ? याची योजना तयार आहे.


भाजप  मजबूत संघटना + विकासाची कामगिरी + स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व.


विपक्ष - आयात नेतृत्व + अंतर्गत कमकुवत रचना + मागील कार्यकाळातील निष्क्रियता.


मतदार स्वतःच याचे मूल्यमापन करत आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !