बोरगांव येथील इथेनॉल प्रकल्पात मोठा स्फोट ; प्रकल्पाला लागली आग.

बोरगांव येथील इथेनॉल प्रकल्पात मोठा स्फोट ; प्रकल्पाला लागली आग.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२०/११/२५ ब्रम्हपुरी पासून अवघ्या 2 कि.मी.अंतरावर असलेल्या बोरगाव येथील नव्याने सुरू झालेल्या रामदेव बाबा इथेनॉल कंपनीच्या डिस्टेन्शन प्लांटमध्ये टेस्टिंग सुरू असता झालेल्या स्फोटात आग लागली.हळूहळू आगीने उग्रारुप धारणकरून ती कारखाना भर पसरू लागली.स्फोटाने बोरगांव,उदापूर,झिलबोडी येथील घरे हादरून गेली त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले.


स्फोट एवढा जबरदस्त होता की कारखान्यात शेजारील बोरगाव, उदापूर, झीलबोडी येथील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या सदर घटना दुपारी अंदाजे ०४-३० वाजता घडली.या घटनेत २ कामगार जखमी झाल्याचे समजते.संभाव्य आगीने रौद्ररूप धारण करू नये म्हणून अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्या साठि घटनास्थळी ब्रह्मपुरी,नागभीड सिंदेवाही,मुल येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाविण्यात आल्या.


तसेच गडचिरोली जिल्ह्यातून २ व वडसा देसाईगंज येथुन १ अग्निशमनदलाची गाडी बोलाविण्यात आली.महानगरपालिका चंद्रपुर येथील ०२ फायर टेंडर फोम सोल्युशन आल्या.यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !