सिरोंचा तालुक्यात युवाशक्तीची नवी मशाल ; कॉ.रवी बरसांगडी यांची AIYF तालुका अध्यक्षपदी निवड.
एस.के.24 तास
सिरोंचा : भांडवलशाही आणि शोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक धार देण्यासाठी,ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) या ऐतिहासिक संघटनेने गडचिरोली जिल्ह्यात आपल्या संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सिरोंचा तालुका अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी धडाडीचे युवा कार्यकर्ते कॉ. रवी बरसांगडी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
AIYF महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉ.सचिन मोतकुरवार यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.लढवय्या नेतृत्वाची निवड सिरोंचा सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात बेरोजगारी, शिक्षण आणि जल - जमीन - जंगलाच्या हक्कासाठी तरुणांना संघटित करणे ही काळाची गरज बनली आहे.
कॉ.रवी बरसांगडी यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांची असलेली जाण लक्षात घेऊन संघटनेने त्यांच्यावर हा विश्वास टाकला आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवा चळवळीला मोठी उभारी मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शोषणाविरुद्ध एल्गार या नियुक्तीप्रसंगी बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, " आजचा युवक केवळ पोकळ आश्वासनांचा बळी ठरत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे तरुणांचे भविष्य अंधारात आहे. ही नियुक्ती केवळ पद नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार आहे."
नवनियुक्त अध्यक्ष कॉ.रवी बरसांगडी यांनी आपला निर्धार व्यक्त केलेत." लाल बावट्याच्या विचारांनी प्रेरित होऊन,सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक शोषित तरुणाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. 'शिका आणि संघटित व्हा' हा मंत्र घेऊन आम्ही गावोगावी युवा फळी उभी करू आणि जनसामान्यांचे प्रश्न तडीस नेऊ. "
चळवळीत उत्साहाचे वातावरणया निवडीमुळे सिरोंचा तालुक्यातील डाव्या चळवळीत आणि तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय आणि सामाजिक स्तरांतून कॉ. रवी बरसांगडी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात तालुक्यात AIYF च्या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत.

.jpg)