वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक 11 जानेवारी 2026 ला वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक चामोर्शी येथे नुकतीच संपन्न झाली. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनात्मक बांधणी,बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या तसेच निवडणूक रणनीती यावर मार्गदर्शन करण्यात आले.
पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून उभी राहणार असून, बहुजनांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीला वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे
उपाध्यक्ष रघुनाथजी दुधे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य ऍड अनंत उंदीरवाडे,चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रेम जगझाके,देवानंद दुर्गे, सुधाकर रामटेके, भीमराव कोसनकर,प्रज्योत बांबोळे,पंकज सोरते,ज्येष्ठ महिला नेत्या मंदाताई तुरे,बबीता माहोरकर,यशोधरा लाकडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी,पक्षाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या,मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

