चामोर्शी बस स्थानकाचे काम यावर्षी तरी पूर्ण होईल का ? - राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक 11 जानेवारी 2026 गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्या व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे व्यापारी पेठ म्हणून ओळखले जाणाऱ्या चामोर्शी शहरात दररोज विविध गावातून ये - जा विद्यार्थी विद्यार्थिनी
व अन्य प्रवासी यांना गेल्या साडेसात वर्षापासून प्रचंड त्रासाचा सहन करावा लागत आहे चामोर्शी शहरात यशोधरा कन्या विद्यालयाच्या बाजूला गेल्या साडेसात वर्षापासून सुरू असलेल्या अतिशय रेंगाळलेल्या बस स्थानकच्या कामाचे
कौतुक करावे तितके कमी आहे कारण गेल्या इतक्या वर्षापासून आजही येथील काम संथ गतीने सुरूच आहे परंतु काम काही पूर्ण झालेला नाही ? प्रशासनाने आजही याबाबत कुठल्याही प्रश्न कंत्रालदाराला विचारलेला नाही ? दररोज हजारो प्रवासी चामोर्शी येथील मुख्य मार्गालगत उन्हा तान्हात ताटकळत उभे राहतात.
विद्यार्थ्यांची दररोज खूप मोठी गैरसोय होते.येथील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रवासी नागरिकांना पैसे देऊन पिण्याचे पाणी बॉटल घेऊन पाणी प्यावे लागते ? त्याचप्रमाणे शौचालयाची सोय नसल्याने खूप मोठा त्रासाचा सामना चामोर्शी तालुक्यातील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना करावा लागत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चामोर्शी शहरात होत असलेल्या नवनिर्मित बस स्थानकाच्या कामाला गती द्यावी.
तात्काळ बस स्थानकाचे काम पूर्ण करून लवकरात लवकर येथील बस स्थानक खुले करावे,अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, किशोर कुंडू, तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड, तालुका सचिव दिनेश मुजुमदार,संतोष बुरांडे ,व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केली आहे.

