ने.हि.महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी ग्रंथालयातील ७६,८५७ ग्रंथापैकी बहूउपयोगी ग्रंथ प्रदर्शनीत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात वार्षिकोत्सव २०२५-२६ चे निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात भव्य ग्रंथालय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयातील ७६,८५७ ग्रंथांपैकी काही महत्वाचे ग्रंथ ग्रंथप्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.
या ग्रंथप्रदर्शनीचे उद् घाटन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया,गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे,सहसचिव अँड भास्कर उराडे, प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, मेजर विनोद नरड उपस्थित होते.सदर ग्रंथप्रदर्शनीचे अवलोकन संस्थेचे उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया,प्राचार्य एस एन पठाण,रमेशजी भैया,डॉ.धनराज खानोरकर, डॉ असलम शेख,डॉ.युवराज मेश्राम इ.मान्यवरांनी केले.
या ग्रंथप्रदर्शनीला विद्यार्थ्यांनीही भेट दिली.यशस्वीतेसाठी सुषमा राऊत,दत्तू भागडकर, माणिक दुपारे,अनिल निनावे, शशिकांत माडे,सौरभ जयस्वाल,जितू मंडपे,यांनी मोलाचे सहकार्य केले.


