महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत रोजी रक्तदान शिबिर आयोजन
📍गडचिरोली विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी श्री.कल्पेश खारोडे त्यांच्या पत्नी श्रीमती पूजा कल्पेश खारोडे सह जोडीने रक्तदान करुन केला आदर्श निर्माण स्तरावरून कौतुक.
एस.के.24 तास
गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत दि. 08 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात संपूर्ण जिल्ह्यातील 1200 हुन अधिक पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार व नागरिक यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन मानवी रक्ताला इतर कुठलाही पर्याय नाही त्यामुळेच रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते आणि ते वास्तविकता खरेही आहे हे सिद्ध करुन दिले.
गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असताना आपल्या विविध कामगिरीने सर्वांना प्रभावित करणारे गडचिरोली विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी श्री.कल्पेश खारोडे यांनी आपल्या पत्नी श्रीमती पूजा कल्पेश खारोडे सह जोडीने.
रक्तदान करुन आज समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने रक्तदान करणे हि काळाची गरज आहे हे दाखवून दिले आणि इतरांपुढे आपला आदर्श निर्माण करुन दिले.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

