विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच खरा आनंद मिळतो. - मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे

विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच खरा आनंद मिळतो. - मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : विद्यार्थी व शाळेचा विकास करणे हेच ध्येय ठेवून सेवा केली, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्याच्या प्रगतीत खरा आनंद शोधत गेलो, विद्यार्थी यशस्वी होणे व शाळेचा नावलौकिक होणे हाच आमच्यासाठी पुरस्कार आहे, मी ज्या शाळेत शिकलो तिथूनच मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होऊन निरोप घेणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. 

          

सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याला उत्तर देताना महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले ता. ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांनी मत व्यक्त केले.शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक राजेश क -हाडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या भावपूर्ण सपत्नीक सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी शिक्षक पुरी, महाले, घ्यार , कुमारी अंशुल मॅडम व विद्यार्थी यांनी मनोगतातून सरांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे संस्थेच्या मदतीने शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करताना...


विविध उपक्रम, सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी मिळून मिसळून वागणे, सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पालकांशी जवळचा संबंध यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळेचा नाव लौकिक वाढविण्यासाठी योगदान दिल्याचे मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.


त्यांनी आपले आयुष्य सामाजिक कार्यात घालवावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी सौ.अर्चना बगमारे , शिक्षक सडमाके , नाकाडे ,तोडे मॅडम, भुते मॅडम, माहेश्वरी सुंदरकर मॅडम ,गुलाबजी वाघाडे. अनिल महाजन, राम भारती ,प्रवीण घोरमडे, ऋतिक सुंदरकर , कीर्ती राऊत व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केलेउपस्थित होते. संचालन श्री मेश्राम यांनी तर आभार सचिन क -हाडे सर यांनी व्यक्त केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !