कुणकुमेश्वर देवस्थान परिसरातील उघडी बोरवेल तात्काळ कारवाईची मागणी.
एस.के.24 तास
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील कुणकुमेश्वर देवस्थान परिसरात खोदण्यात आलेली बोरवेल पाणी न लागल्याने तशीच उघडी ठेवण्यात आली आहे. संबंधित खड्डा अद्याप बुजविण्यात आलेला नसल्याने परिसरात येणाऱ्या भक्तांच्या तसेच जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत रवि बारसागंडी, सिरोंचा तालुका सचिव यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. उघडा बोरवेल खड्डा सुरक्षितरित्या बुजवून परिसरात संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात,अन्यथा भविष्यात कोणताही अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी नागरिकांचीही मागणी आहे.

