भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) च्या पाठपुराव्याला यश. 📍फायबर केबल दुरुस्तीबाबत प्रशासनाची दखल ; नेटवर्क सेवा सुरळीत करण्यास सुरुवात.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) च्या पाठपुराव्याला यश. 


📍फायबर केबल दुरुस्तीबाबत प्रशासनाची दखल ; नेटवर्क सेवा सुरळीत करण्यास सुरुवात.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात महाआयटीची ऑप्टिकल फायबर केबल तुटल्यामुळे मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.या गंभीर समस्येबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) तर्फे मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. 


जिल्हा गडचिरोली सहसचिव सचिन मोतकुलवार, सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी, तसेच समाजसेवक रामचंद्र कुमरी,सुरज भाऊ आणि लक्ष्मण ओडेटी यांनी संयुक्तपणे हा पाठपुरावा केला.


भाकपाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून संबंधित विभागाने फायबर केबल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच नेटवर्क सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.भविष्यात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच नियमित देखभाल व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांच्या हितासाठी पुढेही ठाम भूमिका घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !