चामोर्शी तालुक्यातील कळमगांव येथील तुंबडे परिवारातील क्रांती तुंबडे व करण तुंबडे हे दोघे चुलत भाऊ पोलिस दलात.


चामोर्शी तालुक्यातील कळमगांव येथील तुंबडे परिवारातील क्रांती तुंबडे व करण तुंबडे हे दोघे चुलत भाऊ पोलिस दलात. 


एस.के.24 तास 


 चामोशी : जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रमातून यश फुलवत चामोर्शी तालुक्यातील कळमगांव येथील तुंबडे परिवारातील क्रांती अशोक तुंबडे व करण अविनाश तुंबडे हे दोघे चुलत भाऊ पोलिस दलात सामील होऊन एका लहानशा खेड्यात स्वतःचा नावलौकिक मिळवला आहे.पोलिस अत्यंत महत्वाची सार्वजनिक जनसुरक्षा सेवा आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता व सुव्यवस्था राखून नागरिकांना सुरक्षा प्रदान करणे, गुन्हेगारी रोखून मालमत्तेचे रक्षण करणे आदी पोलिस सेवेची मुख्य कार्य आहेत. 


सेवेचे व्रत अंगी बाळगून कळमगाव येथील क्रांती अशोक तुंबडे व करण अविनाश तुंबडे या दोन चुलत भावांनी जिल्हा पोलीस दलात शारीरिक चाचणीत ३९ व पेपर मध्ये ८१ असे १२० समान गुण प्राप्त करून ऐतीहासीक कामगारी केली आहे. क्रांती आणि करण दोघेही भावंड गेल्या वर्षभरापासून गडचिरोली येथे शालेय शिक्षण घेत होते. क्रांती पदवीचे शिक्षण घेत होता तर करण डी फार्म कन्नड (औरंगाबाद ) येथे पूर्ण करून गडचिरोली येथे पोलीस भरतीची तयारी करीत होता.


दोघेही पहाटे मैदान पूर्ण झाल्यानंतर लायबरी करून नेहमी संघर्ष करत राहिले. दोघेही पहिल्याच भर्तीमध्ये समान गुण मिळवून यश प्राप्त केले आहे . आजपर्यंत गावातील ६ युवक पोलिस दलात सामील झाले आहेत. या दोघांना पकडून ८ युवकांची भरती झाली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मित्र परिवारात व गावात कौतूक होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !