वनयोद्धांचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यू झाल्यास रु.50 लाख आर्थिक मदत व सुरक्षा संच मिळावा. 📍शासन व वनाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र वन कर्मचारी- अधिकारी दक्षता सेना यांची आग्रही भूमिका.

वनयोद्धांचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यू झाल्यास रु.50 लाख आर्थिक मदत व सुरक्षा संच मिळावा.


📍शासन व वनाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र वन कर्मचारी- अधिकारी दक्षता सेना यांची आग्रही भूमिका.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास


नागपूर : महाराष्ट्र राज्याचे वन वाचवतांना स्थायी वनरक्षक,वनपाल आणि अस्थाई वनमजूर जंगलातील लागलेल्या वनव्यामुळे, हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे,साप,विंचू यांच्या चावामुळे प्राणांची आहुती देत असतात परंतु त्या बदल्यात त्यांच्या कुटुंबांना मिळणारी रुपये 5 लाखाची आर्थिक मदत ही शासन व वन विभाग यांना काळीमा फासणारी आहे.



त्यामुळे महाराष्ट्र वन कर्मचारी- अधिकारी दक्षता सेना महाराष्ट्र राज्य यांनीशासन,वन प्रशासन यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली की,वनयोद्धाचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रुपये 50 लाख आर्थिक मदत व सुरक्षा संच - फायर प्रूफ सूट - बूट,मास्क, हेल्मेट,देण्यात यावा अशी आग्रही भूमिका त्यांनी शासन व वन विभागास केली आहे.


जर शासन व वन विभागाने 15 दिवसात मागणी पूर्ण केली नाही,मागण्यांचे अंमलबजावणीचे आदेश निर्गमित केले नाहीत तर या अन्यायाविरोधात महाराष्ट्र वन कर्मचारी - अधिकारी दक्षता सेना माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल आणि आमरण उपोषणासारखे शस्त्र हाती धरून मागण्या पूर्ण करण्यास शासन व वन विभागाला कटीबद्ध करण्यास भाग पाडेल.


वन कर्मचारी,अधिकारी,वन मजूर यांची सुरक्षा साधनांच्या अभावी जर जीवितहानी झाली तर डीसीएफ,सीसीएफ,आणि पीसीसीएफ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी लढा देण्याची तयारी महाराष्ट्र वन कर्मचारी अधिकारी दक्षता सेना यांनी दर्शविली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !