पिंपळगाव भोसले येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे तालुका विधी सेवा समिती ब्रह्मपुरी, तालुका बार असोसिएशन, ब्रह्मपुरी ग्रामपंचायत कार्यालय, तसेच पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने कायदेविषयक सल्ला शिबिर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचेअध्यक्ष ग्रामपंचायतचे प्रशासक सुरेशजी दुनेदार होते.
या कार्यक्रमाला उपसरपंच जगदीशजी बनकर,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधवजी उरकुडे ,पोलीस पाटील निखिलजी लोंढे बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट हेमंत उरकुडे, एडवोकेट खोब्रागडे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शामकुडे, ग्राम विकास अधिकारी घुले, गावातील अंगणवाडी कार्यकर्ती,आशा वर्कर ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.
कायदेविषयक सल्ला शिबिराकरिता मार्गदर्शक म्हणून एडवोकेट हेमंत उरकुडे, एडवोकेट खोब्रागडे ,बीट अमलदार पोलीस हवालदार अरुण पिसे, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्यामकुळे,यांनी मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

