वेड्या जिद्दीने पोलीस दलात घेतली भरारी.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रह्मपुरी : घरगुती काम करणाऱ्या विधवा महिलेच्या मुली ची चंद्रपूर पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. कुमारी कावेरी प्रमोद तूपट राहणार हनुमान नगर ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या मुलीचे वडील हे दुसरी पत्नी केल्यानंतर तिच्या आईने सौ.उषा प्रमोद तुपट राहणार हनुमान नगर
ब्रह्मपुरी हिने वडिलांची जबाबदारी निभवून मुलीला पदवीधर पर्यंतचे शिक्षण देऊन लहानाची मोठी करून गरीब परिस्थितीमुळे लोकांच्या घरी भांडे घासून, मोल मजुरी करून, कुमारी कावेरी प्रमोद तुपट हिला मोठे करून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणात घेण्यात मोठा हातभार लावला. कावेरीने प्रशिक्षणात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण केले.
जिद्द व चिकाटी अंगी बाळगून पोलीस भरती मध्ये उतरून चंद्रपूर पोलीस दलामध्ये ती भरती झाली आहे.त्यानिमित्त एका गरीब व घरगुती काम करणाऱ्या मुलीचा सत्कार पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे पोलीस पाटील व शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज खडसे तसेच पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे सदर मुलीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
व या मुलीच्या आदर्श ठेवण्याकरिता अशा प्रकारचे सत्कार सोहळे झाले तर पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी एक मोठा व्यासपीठ तयार होईल असे मनोगत पोलीस निरीक्षक प्रमोद बानवले साहेब यांनी व्यक्त केले व आभार प्रदर्शन पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी केले.
त्यावेळी पोलीस पाटील तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश जी भोयर सचिव वीर दर्जी देशमुख सदस्य चंद्रशेखर को सलवार अमोल मोरांडे जयाबाई मीसार पोलीस पाटील फुललेले पोलीस पाटील भूषणजी कुथे अकुलजी राऊत प्रमोद घुबडे राहुल धनपालजी वंजारी व प्रत्येक गावचे पोलीस पाटील तसेच बौद्ध समाज शांतता कमिटीचे ब्रह्मपुरी तालुक्यातील संपूर्ण सदस्य या कार्यक्रमाच्या वेळी हजर होते.

