लोकसेवा ही गुड गव्हर्नर होय. - प्राचार्य डाँ.सुभाष शेकोकर सेवा हक्क दिन.

लोकसेवा ही गुड गव्हर्नर होय. - प्राचार्य डाँ.सुभाष शेकोकर  सेवा हक्क दिन.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक


ब्रह्मपुरी : कोणत्याही शासनाचे आद्य कर्तव्य हे लोकांना उत्तम सेवा असते.या अनुषंगाने अलिकडे शासनाने गुडगव्हर्नर म्हणून अधिनियम २०१५ हा कायदा करुन त्याची अमंलबजावणी करण्यासाठी २८ एप्रिल सेवा हक्क दिन साजरा करुन या कायद्याचा जनतेत जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.शासनव्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करुन भ्रष्टाचारमुक्त भारत देश झाला पाहिजे याकरिता शासनाने हा कायदा अमंलात आणला आहे.


तो कायदा जनतेला माहित होणे, आवश्यक आहे. एखाद्या ग्राहकाचे शोषण होत असेल तर या कायद्यार्तंगत माहिती मागून आपल्या हक्क व अधिकाराचा वापर करावा, असे शासनाने धोरण आहे. आणि म्हणून शासनाने अधिनियम २०१६ हा क्रांतीकारी कायदा अमंलात आणून लोकांना उत्तम सेवा देणे हे गुडगव्हर्नर चे इतिकर्तव्य समजून जनतेत कायद्याचे प्रसार करण्यासाठी हा कायदा विद्यार्थी व नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे मौलिक मार्गदर्शन प्राचार्य डाँ सुभाष शेकोकर यांनी सेवा हक्क दिनानिमित्त केले. 

    

कार्यक्रमाचे आयोजन ने हि महाविद्यालय, ब्रम्हपुरी. येथिल महाराष्ट्र २० गल्स बटालियन व एन सी. सी व एन एस एस विभागाच्या वतीने वाचनकक्षात करण्यात आले होते.यावेळी विचारपीठावर मेजर विनोद नरड,मराठीचे वक्ते साहित्यिक डाँ.धनराज खानोरकर,डाँ.युवराज मेश्राम, डाँ.प्रकाश वट्टी, डाँ के के गील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डाँ प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार डाँ के के गील यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !