चिमूर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर..! 📍गतिमंद महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याचे उघड,पीडित महिला 5 महिन्यांची गर्भवती.

चिमूर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर..! 


📍गतिमंद महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याचे उघड,पीडित महिला 5 महिन्यांची गर्भवती.


 एस.के.24 तास 


चिमुर : चिमूर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका असहाय्य, निराधार आणि गतिमंद महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याचे उघड झाले असून या कृत्यामुळे पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे.या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला मतिमंद असून तिला बोलता येत नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर ती गावात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत होती. तिचा कोणताही आधार नसल्याचा फायदा घेत अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केला.

काही दिवसांपूर्वी गावातील आशा सेविका आणि इतर महिलांना पीडितेच्या शारीरिक अवस्थेत बदल जाणवला. संशय आल्याने त्यांनी तत्काळ तिला विश्वासात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. वैद्यकीय अहवालात ती महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ माजली.


पीडितेच्या भावाने या प्रकरणी भिसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !