मौजा जारावंडी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.


मौजा जारावंडी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.


एस.के.24 तास 


एटापल्ली : जारावंडी : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मौजा जारावंडी, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज संघटना,जारावंडी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वज वंदनाने करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. सपनाताई कोडापे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला.त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, त्रिसरण व बुद्ध वंदना, तसेच दीपप्रज्वलन असे विविध धार्मिक विधी पार पडले.


या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून वासुदेव कोडापे (सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली), उपसरपंच सुधाकर टेकाम,जनकशाह नाहामुर्ते (पोलीस पाटील), हरिदास टेकाम (माजी सरपंच) यांच्यासह दिलीपजी दास,मुकेश कावळे,लक्ष्मीताई कुमरे, अन्नपूर्णा मोहुर्ले, योगेश कुमरे (सामाजिक कार्यकर्ते) आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 संदिप येनगंटीवार,रमेश बोनगीरवार, अशोक बेताल, मल्लाजी येनगंटीवार, लक्ष्मण चन्नेवार, पेंटाजी येनगंटीवार, मंगेश येनगंटीवार,संपत चन्नेवार,गणेश चन्नेवार, लोकेश येनगंटीवार, राकेश येनगंटीवार, राजकुमार येनगंटीवार, प्रीतम डोंगरे, आकाश चन्नेवार, कार्तिक चन्नेवार, सुरज चन्नेवार, चंद्रशेखर चन्नेवार यांच्यासह अनेक समाजबांधव, भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना खीर - पोळीचे वाटप करण्यात आले. एकूणच हा सोहळा प्रेरणादायी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला असून,यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !