जप्राबाद ग्रामपंचायतीतील प्रलंबित प्रश्नांवर तोक आंदोलनाचा इशारा.

जप्राबाद ग्रामपंचायतीतील प्रलंबित प्रश्नांवर तोक आंदोलनाचा इशारा.


एस.के.24 तास 


सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद येथील विविध प्रलंबित समस्या व कथित गैरव्यवहारांबाबत भाकपा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी डेप्युटी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद यांना निवेदन सादर केले आहे.गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमितता, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा, विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव,शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांना न मिळणे.

तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी न होणे अशा अनेक समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित प्रकरणांची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास येत्या काही दिवसांत ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाकपा पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने तोक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रवि बारसागंडी यांनी दिला आहे.या निवेदनामुळे तालुक्यातील प्रशासनाचे लक्ष जप्राबादकडे वेधले गेले असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !