आरमोरी - वडसा मार्गावर भीषण अपघात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. 📍ट्रक चालक फरार,पोलिसांनी ट्रक केला जप्त.

आरमोरी - वडसा मार्गावर भीषण अपघात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू.


📍ट्रक चालक फरार,पोलिसांनी ट्रक केला जप्त.


एस.के.24 तास 


आरमोरी : आरमोरी - वडसा मार्गावर कामानिमित्त जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत व्यक्तीची ओळख शिवाजी ढिवरे (रा. ब्रम्हपुरी) अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

हे गृहस्थ आरमोरीवरून वडसाकडे आपल्या कामासाठी जात होते.समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,शिवाजी ढिवरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, आरमोरी पोलिसांनी अतिशय तत्परतेने तपासाची चक्रे फिरवली आणि संबंधित ट्रकचा शोध घेऊन तो ताब्यात घेतला.जप्त करण्यात आलेल्या ट्रकचा क्रमांक MH.40 BG 7497 असा आहे.

सध्या या गंभीर घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करत असून,फरार ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे या मार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !