धनगर/कुरमार समाज जुनासुर्ला तर्फे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजभूषण पुरस्काराचे वितरण व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

धनगर/कुरमार समाज जुनासुर्ला तर्फे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजभूषण पुरस्काराचे वितरण व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.


एस.के.24 तास 


मुल : धनगर/कुरमार समाज जुनासुर्ला तर्फे दिनांक ३१ मे रोजी जुनासुर्ला येथे *पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301 जयंती निम्मित सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.रामुजी कोरीवार व सहउद्घाटक सौ. येल्लूबाई कोरीवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.जाणूजी मिडपलवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.बिराजी कंकलवार,माणिक पाटेवार शिक्षक,व रवींद्र कोरीवार अभियंता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.धनगर समाज जुनासुर्ला तर्फे गेल्या तीन वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 

या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व नवनियुक्त महाराष्ट्र पोलीस नागपूर शहर पदावर निवड झाल्याबद्दल अक्षय बिराजी कंकलवार,आणि डायलिसीस टेक्निसिन,डायलिसिस सेंटर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे निवड झालेले कु.समीक्षा माणिक पाटेवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

अतिशय कठोर परिश्रमातून पुढे गेलेल्या या युवकांनी जुनासुर्ला गावाचे नाव उंचावले असून यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

तसेच नुकताच काही दिवसांपूर्वी दहावी / बारावीच्या निकाल जाहीर करण्यात आला. यात धनगर/कुरमार समाजातून उत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थी मयूर दयलवार, सुमित गादलवार, उमेश आरेवार,कांचन इनमूलवार,सृष्टी रामेवार,संगम रामेवार व NMMS उत्तीर्ण नंदिनी देऊलवार यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

सदर कार्यक्रमात धनगर/कुरमार समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कोमावार यांनी केले तर मुकेश इनमूलवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

यानंतर सर्वधर्म समभाव, सामाजिक एकता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेमध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक झाकी व वेशभूषा सादर करण्यात आल्या. 

या महान विभूतींनी समाजाला दिलेल्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्री-सक्षमीकरण, बंधुभाव आणि मानवतेच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. विविध धर्म, जाती आणि समाजघटकांमध्ये ऐक्य व परस्पर सन्मानाची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या शोभायात्रेचा मुख्य उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी या झाकींचे उत्स्फूर्त स्वागत करून समाजप्रबोधनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !