जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बंडुजी रामटेके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सदिच्छा भेट.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बंडुजी रामटेके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सदिच्छा भेट.


एस.के.24 तास 


जिल्हा सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.बंडुजी रामटेके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा,रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच भविष्यातील आरोग्यविषयक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.डॉ.रामटेके यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड.राहुल थोरात,मूल तालुका सरचिटणीस राजेंद्र वाढई,भद्रावती तालुका अध्यक्ष संतोष शिवणकर तसेच वासुदेव नांदूरकर उपस्थित होते.

नवीन पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल उपस्थितांनी डॉ. बंडुजी रामटेके यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !