रोहित कामडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेल चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. 📍दिव्यांग बांधवांचा आवाज आता अधिक बुलंद होणार.

रोहित कामडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेल चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.


📍दिव्यांग बांधवांचा आवाज आता अधिक बुलंद होणार.


एस.के.24 तास


मुल : दि.३१ मे २०२५ समाजातील दिव्यांग नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे, संकटग्रस्तांसाठी सदैव सज्ज असणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष ओळख असलेले रोहित प्रकाश कामडे यांची " राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग सेलच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी " नियुक्ती करण्यात आली आहे. 


ही नियुक्ती पक्षाच्या राज्य संयोजिका सौ.नीताताई ढवाण यांच्या स्वाक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.


रोहित कामडे हे मुल तालुक्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. विशेषतः दिव्यांग नागरिकांसाठी ते नेहमी पुढे राहून काम करत आले आहेत.शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे, गरजूंसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, सहाय्य मिळवून देणे, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न समाजाने पाहिला आहे.


या निवडीबद्दल बोलताना पक्षाच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कक्कड, विधानसभा जिल्हाध्यक्ष सुनील काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, वैद्यकीय जिल्हाध्यक्ष पंकज ढेगारे, कामगार जिल्हाध्यक्ष संजय सेजुल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर गोमासे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी रोहित कामडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


" ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर एक संधी आहे.दिव्यांग बांधवांसाठी अधिक भक्कम पायाभूत सुविधा आणि न्याय मिळवून देण्याची. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मा. अजितदादा पवार आणि पक्ष नेतृत्वाच्या प्रेरणेतून मी काम करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग नागरिकाच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांचे योग्य समाधान मिळवणे, हेच माझे मुख्य ध्येय राहील." - रोहित कामडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेल चंद्रपूर चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष.


रोहित कामडे यांच्या या निवडीमुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळाले असून दिव्यांग समाजात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे नेतृत्व हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या दिव्यांग नागरिकांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.


एक साधा कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष - रोहित कामडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणारा एक जबाबदार नेतृत्वकर्ता त्यांच्यातून पुढे आला आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !