समोर जात असलेल्या पिकअप वाहनास दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार ठार.



समोर जात असलेल्या पिकअप वाहनास दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार ठार.


एस.के.24 तास

एटापल्ली : मागुन जाणार्‍या दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडल्याने दुचाकी घसरली. दरम्यान समोर जात असलेल्या पिक अप वाहनास दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवार २ जुलै रोजी एटापल्ली - आलापल्ली मार्गावरील गुरूपल्ली नजीक घडली.रघु आत्राम वय, २३ वर्ष रा.पंदेवाही असे मृतकाचे नांव आहे.


प्राप्त माहितीनुसार  एटापल्ली कडून आलापल्ली कडे पीक अप क्रमांक  एम एच ३३ टी २९९६ जात असतांना  रघु आत्राम हा एमएच ३३ ए एफ - १९६७  क्रमांकाच्या दुचाकीने मागोमाग येत होता. दरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी घसरली. मात्र ती थेट पिकअप वाहनास जाऊन धडकली.


धडक एवढी जबरदस्त होती की,बाईकचालकाचा जागेवरच मृत्यू झाला.पोलीसांना माहिती मिळताच पोलीस अपघात  स्थळी हजर झाले.पंचनामा करून मृतकाचे प्रेत एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.पुढील तपास एटापल्ली पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !