📍सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र सलामे यांना अटक.
एस.के.24 तास
भंडारा : शिक्षक भरती घोटाळ्यात अटकसत्र सुरू असतानाच सदर पोलीस ठाण्यात आणखी एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा (सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र पंजाबराव सलामे यांना आज अटक करण्यात आली.
सलामे यांच्यावर नागपूर पोलिसांत भादंविचे कलम 420, 465, 468, 471, 472, 409, 120 ब, 34 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पराग नानाजी पूडके राहणार लाखनी हा कधीही कोणत्याही शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीच नसताना त्याचे नानाजी पूडके विद्यालय जेवणाळा या शाळेतील मुख्यध्यापक पदाचे नियुक्ती करीता त्याने बनावट शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे नियुक्ती मान्यता आदेश,
सेवा सातत्य, एस के.बी.शाळा यादव नगर नागपूर या शाळेचे लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र गुन्ह्यातील अटक आरोपी महेंद्र म्हैसकर याचे सोबत कट कारस्थान रचून व गैर व्यवहार करून तयार करून सलामे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.