मानव कुटी जीवन संशोधन केंद्राचे माजी आम.प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते उद्घघाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०४/०७/२५ ब्रह्मपुरी येथील आचार्य डॉ. संजय सुशीला प्रभाकरराव हर्षे यांनी सुरू केलेल्या मानव कुटी जीवन संशोधन केंद्र ब्रह्मपुरी चे उद्घघाटन या विधानसभा क्षेत्राचे माजी. आम. प्रा.अतुल देशकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या केंद्रात मानवी जीवनातील सर्व घडामोडींचा व समस्यांचा अचूक वेध घेवून त्यावर उपाय या केंद्रात दिले जातील.
यामध्ये ॲस्ट्रॉलाजी, न्युमरालाॅजी, हिप्पनोसीन, वास्तुविषारद, लोलक विषारद,आर्किटेक्चर, फेस रीडर, नॅचरोपॅथी, योग सायन्स, व आयुर्वेद यांच्या द्वारे उपाय दिले जातील.
डॉ. हषै यांनी आपल्या पत्नी स्व. सौ. जयश्री हषै हिच्या ७ व्या स्मृती दिना प्रित्यर्थ मानव कुटी जीवन संशोधन केंद्र सुरू केले आहे. याप्रसंगी श्री. विजय हषै गोंदिया, प्रा. संजय लांबे, प्रा. चंद्रकांत विटाळकर, प्रा. बंडु रेहपाडे आरमोरी,श्री.अतुल गौरशेट्टिवार, दिलिप शिनखेडे, विलास खरवडे, नानाजी गराडे, अरुण भगत, बाळु भानारकर, श्रीमती मीराबाई करंडेकर लाखांदूर उपस्थित होते.