बेपत्ता महिलेचा जंगलात सापडला मृतदेह.
📍2 दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह जंगलात सापडला ; मृत्यूचं नेमकं कारण अजूनही गुढ असून पोलिस तपास करत सुरु आहे.
एस.के.24 तास
कर्नाटक : उडुपी जिल्ह्यातील कोल्लूर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शनिवारी सापडला आहे. महिला बेपत्ता होताच त्यांच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.पोलिसांनी शोध घेताच त्यांचा मृतदेह सापडला आहे.महिलेचा मृतदेह जंगलात सापडल्यामुळे कुटुंबाला धक्का बसला आहे.सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरूआहे.
वसुधा चक्रवर्ती वय,45 वर्ष असे मृत महिलेचं नाव आहे. महिला बंगळूरूतील रहिवासी असल्याची माहिती आहे. महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईनं पोलीस ठाणे गाठले.वसुधा यांची आई यांनी दाखल केलेल्या तक्रारीत 27 ऑगस्ट रोजी वसुधा उडुपी जिल्ह्यातील कोल्लूर येथील श्री.मुकाम्बिका मंदिराच्या दिशेनं गेली होती. ती कारने गेली होती.या दरम्यान मंदिर परिसरातील अतिथीगृहाजवळ गेल्यानंतर तिने कार पार्क केली.
गाडी पार्क केल्यानंतर वसुधा बाहेर गेली.पण ती परत घराकडे आली नाही,अशी माहिती वसुधा च्या आईने दिली. वसुधाच्या आईनं वसुधाला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधा यांच्या आईने कोल्लूर गाठले. तसेच मंदिर आणि परिसरातील लोकांकडे लेकीची चौकशी केली.
परिसरातील काहींनी वसुधाला पाहिले होते.वसुधा अस्वस्थ दिसत असल्याची माहिती दिली. नंतर रस्त्याच्या दिशेनं पळून गेली.त्यानंतर तिचा पत्ता लागला नाही.अशी माहिती परिसरातील लोकांनी दिली. मंदिर परिसरात आणि आजूबाजूला शोध घेऊनही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.नंतर वसुधाच्या आईनं पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारी च्या आधारे कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार,वसुधा यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांना असा संशय होता की, वसुधा यांनी कदाचित सौपर्णीका नदीत उडी मारली असावी. नंतर वाहून गेली.
उडुपीचे एस.पी.हरिराम शंकर म्हणाले की,प्राथमिक तपासात असे दिसून आले की,सौपर्णीका नदीच्या 3 कि.मी.अंतरावर वसुधा यांचा मृतदेह सापडला.मृतदेह जंगलात सापडला.कदाचित मृतदेह नदीतून वाहून जंगलात आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वसुधा यांच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.