प्रसूती पश्चात एका बाळाचा आणि मातेचा दुर्दैवी मृत्यू ; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप.
एस.के.24 तास
भंडारा : मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक काळ असतो. या काळात आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वोच्च गरज असते.गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात योग्य काळजी न घेणे या दोघांसाठीही जोखमीचे कारण ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर शासन पंतप्रधान सुरक्षित मातृत्व सारख्या योजना राबवण्यात येतात मात्र ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांचा अभाव आणि अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ आणि बाळंतीणीला जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना आजही ग्रामीण भागात घडत असतात. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे.प्रसूती पश्चात एका बाळाचा आणि मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मागील सहा महिन्यात तीन बाळंतिण आणि गर्भवती महिलांनी जीव गमावल्याच्या घटना लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात घडल्या आहेत. सरांडी बुज, चिचगाव, त्यानंतर आता आसोला गावातील या बाळंतीण आणि बाळाचे जीव गमावला आहे . सध्या तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
रीना शहारे यांना सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यावेळी माझ्यासह स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञ तेथे हजर होते. बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. दरम्यान, रीना यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने आणि रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र वाटेतच अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे एनआयसी, लहान मुलांचे अतिदक्षतागृह किंवा बधिरीकरण तज्ञ किंवा कोणत्याही अत्यावश्यक सुविधा नाहीत, असे लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी सांगितले.
जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष, आयरन आणि फोलिक ऍसिड पूरक आहार अशा अनेक योजना असताना आजही ग्रामीण भागातील जननी आणि बाळ असुरक्षित आहे. त्यामुळे या सर्व योजना केवळ कागदावरच आहे हे सिद्ध झाले आहे. आरोग्य हे प्राथमिकता असताना याला दुय्यम स्थानी ठेवल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे, असे जयश्री बोरकर, म्हणाल्या.