गडचिरोली जिल्ह्यातील स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही त्या गावापर्यंत पोहचले नाही रस्ते ; ४७ गावांना अद्यापही पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो.
एस.के.24 तास
गडचिरोली : रस्ते हे विकासाचे राजमार्ग असल्याचे बोलल्या जाते. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असल्यास त्या भागाचा जलगदगतीने विकास होतो असे म्हटल्या जाते.गडचिरोली जिल्ह्यातील ४७ गावांना अद्यापही पायवाटेचाच आधार घ्यावा लागत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
या गावात जाण्यासाठी अद्यापही कोणत्याही योजनेतून रस्ते तयार करण्यात आले नाहीत. यामुळे नागरीकांना जंगलातून पायवाट तुडवितच परीसरातील मुख्य मार्ग गाठावा लागत असल्याची विदारक स्थिती दिसुन आली आहे.
प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात बारमाही रस्ते असलेल्या गावांची संख्या १३२४ एवढी आहे.यामध्ये देसाईगंज तालुक्यात ३१, आरमोरी ९१, कुरखेडा ११७, कोरची ११७, धानोरा १८४, गडचिरोली १०७, चामोर्शी १८५, मुलचेरा ६१, एटापल्ली १२०, भामरागड ६५, अहेरी १४२ तसेच सिरोंचा तालुक्यात बारमाही रस्त्यांची संख्या १०४ एवढी असल्याचे निदर्शनास आले आहे.४६ गावात जाण्यासाठी अद्याप कोणत्याही स्वरूपाचे रस्ते तयार करण्यात आले नाहीत.
यामध्ये कुरखेडा तालुक्यातील १,कोरची तालुक्यातील ४, धानोरा तालुक्यातील १३, मुलचेरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील १, भामरागड तालुक्यातील २१ आणि अहेरी तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. धानोरा व भामरागड तालुक्यातील ३४ गावामध्ये अद्याप कोणत्याही स्वरूपाचे रस्ते नसल्याने या गावांचा विकास रखडला आहे. यामुळे ही गावे मुख्य रस्त्याशी जोडण्याकरीता विशेष योजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.