परिवर्तनाच्या चळवळीतील खंदा,सच्चा भीमसैनिक,किर्तीवंत मारोतरावजी कांबळे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०९/२५ दिनांक,२३ सप्टेंबर २५ ला सायंकाळी ७-०० वाजता नागपुर मधील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आंबेडकरी नेते, रिपब्लिकन योद्धा आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाची गंगा वाहून आणणारे,शोषित,वंचित,पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारे
पक्ष निष्ठावंत, शिक्षण महर्षी, सामाजिक कार्यात सतत कार्यरत राहणारे ब्रह्मपुरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय तथा विद्यालय यांचे संस्थापक ८ मे १९३६ ला जन्म झालेले सन्माननीय मारोतरावजी कांबळे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दु:खद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवाला काल हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात मुलगा प्राचार्य डॉ.देवेश,डॉ राजेश व कुटुंबातील सदस्यांनीअग्नी दिला तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून दुःखाश्रु वाहू लागले.
त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. ब्रह्मपुरी परिसरात एक सांस्कृतिक, सामाजिक ,राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना झालेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी बोलून दाखविल्या. त्यांनी केलेल्या कार्याची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
त्यांच्या मागे मुलगा प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, डॉ.राजेश कांबळे, मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा मित्रपरिवार आहे.काल त्यांच्या चाहत्यांनी पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांना शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण करून अखेरचा निरोप देण्यात आला.