जिवती तालुक्यात स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर दि.03/10/2025 शुक्रवार : जिल्ह्यातील जिवती तालुक्याअंतर्गत पाटागुडा, चलपतगुडा, मच्छीगुडा, कलगुडी, खडकी रायपुर व सिंगारपठार या गावांकरीता 6 नवीन रास्त भाव दुकानाचे परवाने मंजुरीसाठी जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले होते.
त्यास अनुसरुन त्याच गावातील / क्षेत्रातील इच्छूक पंचायत (ग्राम पंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) / नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट / नोंदणीकृत सहकारी संस्था / महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था / महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांकडून विहीत नमुन्यात 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
परंतु विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्याने जिवती तहसीलदार यांनी मुदतवाढीसंदर्भात केलेल्या विनंतीनुसार, अर्जदार गट/संस्थांना विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार जिवती यांच्या कार्यालयात 6 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध होतील.
नवीन रास्त भाव/स्वस्त धान्य दुकानाकरिता अर्जाची किंमत 5 रुपये राहील. परिपूर्ण भरलेले अर्ज 6 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत शासकीय कामकाजाचे दिवशी तहसीलदार जिवती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकृत केले जातील. उर्वरित अटी व शर्ती मूळ जाहीरनाम्यात प्रसिध्द केल्याप्रमाणे लागू राहतील.
जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेल्या गावाचे / वार्डाचे नाव,तालुक्यातील जाहीरनाम्यांची संख्या, अर्ज करण्याच्या अटी व शर्ती इत्यादी सर्व माहिती तहसीलदार जिवती, संबंधीत तलाठी व ग्राम पंचायत कार्यालयाच्या नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परवाना प्राधिकारी आर.आर.बहादुरकर यांनी कळविले आहे.