म.गांधी आणि लालबहादूर शास्त्री ही देशाची ओळख. - प्राचार्य डॉ.शेकोकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०३/१०/२५ राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सत्य,अहिंसा,न्यायाची नेहमी कास धरुन देशहिताचे कार्य केले.स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीनी प्राणाची बाजी लावली. सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. लालबहादूर शास्त्रीनी ' जय जवान जय किसान'चा नारा देऊन शेतक-यांच्या हितासाठी कार्य केले.' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी त्यांचे कार्य होते.हे दोन्ही नेते आपल्या भारताची ओळख आहेत." असे मार्मिक भाष्य प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बोलत होते.
सर्वप्रथम दोन्ही प्रतिमांना प्राचार्य डॉ शेकोकर व प्रा विनोद नरड यांनी माल्यार्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर उपस्थित डॉ रेखा मेश्राम,डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख, डॉ मोहन कापगते,डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम, डॉ योगेश ठावरी, डॉ युवराज मेश्राम, डॉ कुलजित शर्मा, डॉ प्रकाश वट्टी, डॉ भास्कर लेनगुरे
डॉ पद्माकर वानखडे, डॉ विवेक नागभीडकर, डॉ मिलिंद पठाडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ अजित खाजगीवाले,डॉ दर्शना उराडे, डॉ अतुल येरपुडे,प्रा जयेश हजारे,प्रा धिरज आतला,डॉ मोहुर्ले, प्रा ठोंबरे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, अधीक्षक संगीता ठाकरे,रोशन डांगे,सुषमा राऊत,घनश्याम नागपूरे,दत्तू भागडकर,जयंत महाजन इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा, डॉ खानोरकर, डॉ मेश्राम,प्रा आतला, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.