तृप्ती तुमसरे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ संघात निवड.

तृप्ती तुमसरे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ संघात निवड. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी- २३/०३/२६ राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेतील खेळाडू कुमारी तृप्ती तुमसरे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ संघात निवड करण्यात आली आहे.तृप्ती ही गडचिरोली जिल्ह्यातील अंधरी - वाघेडा या खेडे गावची रहिवासी असून ब्रह्मपुरी येथील गुडविल क्रीडा मंच चे प्रशिक्षक सतीश ठेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने उंच भरारी मारली आहे.

 

येत्या ०२ एप्रिल२६ रोजी आळंदी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ती सहभागी होऊन गडचिरोली व ब्रह्मपुरी चे नाव लौकिक करेल अशी आशा ब्रह्मपुरी व गडचिरोली जिल्हावाशीयांना आहे.तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !