जंगल वाचविणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे काळाची गरज.- बंडू धोत्रे,संस्थापक अध्यक्ष इको प्रो चंद्रपूर 📍सावली वनपरिक्षेत्रात जागतिक वनदिन उत्साहात साजरा.

जंगल वाचविणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे काळाची गरज.- बंडू धोत्रे,संस्थापक अध्यक्ष इको प्रो चंद्रपूर


📍सावली वनपरिक्षेत्रात जागतिक वनदिन उत्साहात साजरा. 


एस.के.24 तास 


सावली : सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र सावली नियतक्षेत्र सादागड मधील रिंगदेव तलावाचे परिसरात बंडोजी धोत्रे संस्थापक अध्यक्ष इको प्रो चंद्रपूर यांचे प्रमुख उपस्थिती तर पाथरी उपक्षेत्रातील भूत तलाव परिसर राजोली उपक्षेत्रातील कन्हाळगाव परिसर, व्याहाड उपक्षेत्रातील सोनापूर महादेव परिसर आणि पेंढरी उपक्षेत्रातील मौजा मानकापूर अशा विविध ठिकाणी 21 मार्च रोजी जागतिक वन दिन पार पडला.


 निसर्गाची ताकद अफाट आहे त्यामुळेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. ही ताकद कायम राहण्यासाठी आपल्याला निसर्गाचे पर्यायाने जंगलाचे संरक्षण करणे काळाची गरज ठरणार आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक बंडूजी धोत्रे यांनी केले. 


संयुक्त राष्ट्र संघाने वनाचे अस्तित्व व संवर्धन महत्व लक्षात घेता 21 मार्च 2012 पासून जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. सावली वनपरिक्षेत्रातील सादागड येथील रिंगदेव तलावाचे परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी बंडूजी धोत्रे संस्थापक अध्यक्ष इको प्रो चंद्रपूर 


कवठी येथील सुरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक के व्ही खोब्रागडे, कवठीचे सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकर, क्षेत्र सहाय्यक नरेश सिडाम, इको प्रो चे कार्यकर्ते अभय अमृतकर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती सादागडचे अध्यक्ष चंदू गेडाम, सहाय्यक शिक्षक व्हि. डी हजारे, विनायक रेकुलवार, कु. एल के सलामे आदींची उपस्थिती होती. 


जागतिक वन दिनानिमित्त शहीद सुरेश पाटील सूरकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सादागड जंगलात असलेल्या रिंगदेव तलावाचे परिसराची व वनक्षेत्राची माहिती, पक्षांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. 


हे आपले संविधानिक कर्तव्य असून एकप्रकारे देशसेवा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तलावाची पाहणी केली व मुक्तपणे वावरणाऱ्या नील गाईंचे त्यांना दर्शन घेता आले. तसेच विविध पक्षी त्यांना जवळून पाहता आले. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना क्षेत्र सहाय्यक सिडाम यांनी विद्यार्थ्यांना जंगला विषयी सविस्तर माहिती सांगितली. 


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक राजू मुरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वनरक्षक लंकेश आखाडे यांनी केले.सदर कार्यक्रमास वनरक्षक बोनलवार, सतीश मोजके,बंडू दुधे,नवनीत व इतर पीआरटी सदस्य आणि शुक्र विद्यालयाचे 54 विद्यार्थी उपस्थित होते..

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !