मौजा मेंढा,पोस्टे गडचिरोेलीे येथील खुनाच्या गुन्ह्रातील एक आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील तर दुसरा इंदिरानगर गडचिरोली आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद. 📍स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टे गडचिरोली येथील तपास पथकांची संयुक्त कारवाई.

मौजा मेंढा,पोस्टे गडचिरोेलीे येथील खुनाच्या गुन्ह्रातील एक आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील तर दुसरा इंदिरानगर गडचिरोली आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद.


📍स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टे गडचिरोली येथील तपास पथकांची संयुक्त कारवाई.


एस.के.24 तास 


गडचिरोली : दिनांक,08/05/2026 चे सायंकाळी मौजा मेंंढा ता.गडचिरोली जि. गडचिरोली येथे अक्षय भानारकर याचे राहाते घरी नामे शामकला सुखदेव किरंगे रा.हिडदा ता. कुरखेडा हिचा मृतदेह आढळून आला होता.यावरून पोस्टे गडचिरोली येथे अप क्र.578/2026 कलम 103 भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्रातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलीसांपुढे मोठे आव्हान होते.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिका­यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री.एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची तपास पथके तयार करण्यात आली होती. 

 सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने तपास पथकांनी अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवून केवळ तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपुर येथून ताब्यात घेतले होते. गुन्ह्राच्या अनुषंगाने त्याची अधिक विचारपूस केली असता, त्याने आपले दोन साथिदारांच्या मदतीने पूर्व वैमनस्यातून शामकला किरंगे हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 

यावरून आज दिनांक,10/05/2026 रोजी 

1) सुदामा रामभाऊ चौधरी, वय 33 वर्षे रा.शिरसगाव ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यास त्याचा साथिदार 

2) चेतन धर्माराव खोब्राागडे रा.इंदिरानगर ता.जि.गडचिरोली 

याचेसह मोठ्या शिताफिने अटक करण्यात आली असून एक विधीसंघर्षीत बालकास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी 

1) सुदामा रामभाऊ चौधरी

2) चेतन धर्माराव खोब्राागडे 

यांना मा.न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून विधीसंघर्षीत बालकास बाल न्याय मंडळासमक्ष हजर करण्यात येणार आहे.सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे गडचिरोलीचे पोउपनि.अतुल तराळे हे करीत आहेत.

सदर गुन्ह्रात केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना निष्पन्न करुन त्यांना अटक करुन अत्यंत गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज जी.उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, सपोनि.भगतसिंग दुलत

पोस्टे गडचिरोलीचे पोनि. विनोद चव्हान,पोउपनि. शिवाजी देशमुख,पोउपनि.माधुरी मिसाळ, पोउपनि.भावना राऊत व अंमलदार यांनी पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री.एम.रमेश यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !