शेतातून घरी परतताच तरुणाची आत्महत्या वैरागड परिसरात हळहळ.!

शेतातून घरी परतताच तरुणाची आत्महत्या वैरागड परिसरात हळहळ.!


एस.के.24 तास 


आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील अशोक देवराव बोधनकर (वय अंदाजे ३५ वर्षे) या तरुणाने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,अशोक बोधनकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात धान मळणीच्या कामासाठी गेले होते. शेतात काम सुरू असतानाच ते अचानक काही कारणास्तव घरी परतले. घरी कोणीही नसताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले. दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मृतक अशोक यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. घराचा आधारवड असलेल्या तरुणाने अशा प्रकारे जीवनयात्रा संपवल्याने बोधनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.अशोक यांनी आत्महत्या का केली ? 

त्यांच्यावर काही मानसिक किंवा आर्थिक दडपण होते का ? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे वैरागड परिसरात शोककळा पसरली असून, एका कष्टाळू शेतकऱ्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !