महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाचे उद्या मुल नगरीत दाखल होणार.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाचे उद्या मुल नगरीत दाखल होणार.


राजेंद्र वाढई - उपसंपादक 


मुल : महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा विशेष चित्ररथ शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता चंद्रपूर येथून मुल नगरीत दाखल होणार आहे. या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत मूल नगरीतील सर्व समाज बांधव, भगिनी, युवक-युवती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चित्ररथाच्या स्वागताची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहणार आहे. सकाळी ८ वाजता इको पार्क, उपजिल्हा रुग्णालय, चंद्रपूर रोड, मुल येथे चित्ररथाचे स्वागत व अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर बाईक रॅलीद्वारे चित्ररथ तहसील कार्यालयाजवळ दहा मिनिटे थांबणार असून पुढे गांधी चौक येथे चित्ररथातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

यानंतर चित्ररथ बाजार रोड,चामोर्शी नाका मार्गे पुढे डोंगरगाव,राजोली,सिंदेवाही,तळोधी,नागभीड व ब्रह्मपुरी येथे रवाना होणार असून विविध ठिकाणी स्वागत व अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर तथा सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !