आता खर्च झाला करून.

 कवी श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...    


आता खर्च झाला करून. 


एस.के.24 तास 


आता खर्च झाला करून 

काटकसर सुरू करा

सारे ब्रह्मांड झाले फिरून

आता पंचसूत्रीचा मार्ग धरा..1


होती नव्हती जमापुंजी 

मतपेटीत गेली शिल्लक होती

प्रवासात,सभेत खर्च झाली

म्हणून बिघडली अर्थनीती..2


पेट्रोल डिझेलच्या गाड्या - घोड्या 

घरीच झाकून ठेवा तुम्ही 

दणकून होईल फायदा मेट्रोला

धक्क्याने अल्प मरण्याची हमी..3


सस्त्यात सोना घेऊन ठेवला 

दाबून ठेवला असेल गड्ड्यात 

रोज वाढते भाव त्याचा 

नको खरेदी शब्द नड्ड्यात..4


इलेक्ट्रिकच्या गाड्या घ्या 

वाटेत जळून भस्म होतील

मोटार मधले प्रवासी बिचारे 

न पेटविता भाजुन जातील..5


बिचाऱ्या शेळीचा जीव जाते 

खाणारा म्हणते वातळ झाली 

देशात अशी कधीच नाही 

कमी तेलाची भाजी शिजली..6


भविष्याचा पेपर फुटतो 

त्याशी लेने देणे नाही

थातुर मातुर अटक चौकशी

डॉक्टर पोरगा तारीख पाहि..7


सगळी व्यवस्था मुजोर झाली 

कोणी कोणाचा नाही वाली 

दोन दिवस शिमग्याच्या बोंबा 

सत्तेसाठी एकमेकाला झोंबा..8


पैसा पैसा करत मरून जातील 

पण पैशाची हाव सुटेना 

चुंबकीय ही सत्तेची खुर्ची 

ताणताही ना तुटे ना ..9


अडाणी बाई नं घर वाया जाई

अशी एक मन आहे

नाव मोठे दर्शन खोटे 

जनता तमाशा रांगुन पाहे 

भोळी जनता रांगुन पाहे..10


कवी : श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे               मु.पो.अ-हेरनवरगांव /ब्रह्मपुरी जिल्हा - चंद्रपुर -४४१२०६ मो.८३०८००५८६८

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !