सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक देवेंद्र भोंडे यांच्या तक्रारीची दखल ; बोगस बंगाली डॉक्टर वर कारवाई.
एस.के.24 तास
अमरावती चांदूररेल्वे : वारंवार तक्रारी देऊन बोगस डॉक्टर बिनधास्त पणे आरोग्य विभागाच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे " कारला " या गावी करत होता रुग्णांच्या जिवाशी खेळ पण आरोग्य विभागाला या बोगस डॉक्टर चा थांगपत्ताच लागेना गावाकडची बातमी चे मुख्य संपादक देवेंद्र भोंडे यांनी वारंवार तक्रारी देऊन ही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नव्हती म्हणुन त्यांनी मुंबई मानवी हक्क आयोग महाराष्ट्र यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती.
आतापर्यंत कारवाई का झाली नाही : -
संबंधित बोगस बंगाली डाक्टर ला सहकार्य करणाऱ्या त्या आरोग्य विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्यास दिरंगाई केल्याबद्दल शिस्तभंग कारवाई करावी.अशी मागणी देवेंद्र भोंडे यांनी मानवी हक्क आयोग (Human Rights) कडे केली आहे.